अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित आणि सकल जैन समाज यांच्यावतीने माढाचे तहसिलदार श्री. भोसले यांना निवेदन

एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर मोडनिंब येथे जैन समाजातर्फे निषेध निवेदन

अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित आणि सकल जैन समाज यांच्यावतीने माढाचे तहसिलदार श्री.भोसले यांना निवेदन

मोडनिंब ता.माढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२७/१०/२०२५- पुणे येथील एचएनडी गुरुकुल अपारदर्शक विक्री संदर्भात व त्याच्या निषेधार्थ सोमवारी येथील भगवान श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंबचे संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित आणि सकल जैन समाज यांच्यावतीने माढाचे तहसिलदार श्री.भोसले यांना निवेदन देण्यात आले.

सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट Seth Hirachand Nemchand Smarak Trust Established on Date-2/8/1954 Public Charity Trust- Reg. No. PTR E-1634 (Mumbai) या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना चुकीची माहिती सादर करत पब्लिक विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा बेकायदेशीर पद्धतीने विक्री केली. देशाच्या इतिहासात प्रथमच प्रतिष्ठित जैन मंदिर है विक्री झाले व गहाण टाकत त्याचे पावित्र्य धोक्यात आणले आहे.संस्थेच्या परिसरात १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर जे ६५ वर्षे जुने आहे त्याचे अस्तित्वच डावलण्यात आले.विहीर ही दाखविण्यात आली नाही.

त्यामुळे एचएनडी गुरुकुल गैर विक्री संदर्भात संपूर्ण राज्यातील जैन समाज आक्रमक झाला आहे.निषेधार्थ राज्यभर मूकमोर्चा, दुचाकी रॅली काढून निवेदन देण्याची मोहीम महाराष्ट्र राज्यासह देशभरात सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून मोडनिंब येथेही निवेदन देण्यात आले.

समाजाच्यावतीने भगवान श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंबचे संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित यांनी या निवेदनाविषयी माहिती देत निषेध नोंदवला आणि हे सेल डीड रद्द होईपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचे आवाहन समाज बांधवांना करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top