मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी

मंगळवेढा तालुक्यात मोठी चोरी – शेतकऱ्याच्या ५० हजारांच्या जनावरांची अज्ञात चोरट्यांकडून चोरी

मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. 03 – मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे शेतकऱ्याच्या पत्राशेडमधून तब्बल ₹50,000 किंमतीच्या जनावरांची चोरी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गुन्हा गुरन. 996/2025, BNS 303(2) प्रमाणे दाखल असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात तपासाची चक्रे वेगात फिरविली आहेत.

फिर्यादी चंद्रकांत मधुकर गुरव वय 55 वर्षे, रा. मरवडे यांनी दिलेल्या माहिती नुसार २ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ३ डिसेंबर रोजी पहाटे २.३० या वेळेत त्यांच्या घराजवळील पत्रा शेडमधून अज्ञात चोरट्यांनी जनावरे लबाडीने चोरून नेली.

चोरट्यांनी पळवून नेलेला माल– ७ शेळ्या – एकूण किंमत अंदाजे ₹35,000 (प्रत्येकी ₹5,000 अंदाजे),३ लहान पाटी (शेळीच्या पिल्ले) – एकूण किंमत अंदाजे ₹3,000 (प्रत्येकी ₹1,000),२ बोकडे (वय एक वर्ष) – एकूण किंमत अंदाजे ₹12,000 (प्रत्येकी ₹6,000) असा एकूण अंदाजे ₹50,000 किंमतीचा माल चोरट्यांनी पळवून नेला.

घटना स्थळ मरवडे येथून दक्षिणेस सुमारे 10 किमी अंतरावर आहे.फिर्यादी यांनी सांगितले की, चोरट्यांनी त्यांच्या समतीशिवाय मुद्दाम लबाडीने ही चोरी केली असून याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

या प्रकरणाचा तपास पोहेकॉ 909 श्री. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पथके राबविण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही व हालचालींचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Back To Top