लामाणतांडा lamantanda : तरुणाला मारहाण करणारा पोलीस पाटील निलंबित – प्रहारच्या उपोषणाला यश

लामाणतांडा प्रकरणात कारवाई : मारहाण करणाऱ्या पोलीस पाटलाचे प्रांताधिकाऱ्यांकडून निलंबन

लामाणतांडा : तरुणाला मारहाण करणारा पोलीस पाटील निलंबित – प्रहारच्या उपोषणाला यश

भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा राग ? पोलीस पाटील सहित सहाजणांची मारहाण; प्रांताधिकाऱ्यांची कडक कारवाई

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज– लामाणतांडा lamantanda गावातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलीस पाटलास अखेर प्रांताधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. प्रहार संघटनेच्या prahar उपोषणानंतर प्रशासनाने कारवाईची गती वाढवत हा निर्णायक निर्णय घेतला. प्रांताधिकारी बी.आर.माळी यांनी आदेश काढत पोलीस पाटील विठ्ठल उर्फ सोपान पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

घटना कशी घडली ?

लामाणतांडा येथे ग्रामपंचायतीकडून बोगस कामे व भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार संजय राठोड यांनी पंचायत समिती व वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून माजी सरपंच, विद्यमान उपसरपंचाचे पती आणि पोलीस पाटील यांसह सहा जणांनी मिळून राठोड यांना प्लास्टिकच्या काठीने मारहाण केली.

या प्रकरणी पोलीस पाटील विठ्ठल पवार, श्रीकांत पवार, हरिश्चंद्र राठोड, निखिल पवार,आकाश पवार आणि निरंजन पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रशासनाची टाळाटाळ, प्रहारचे उपोषण – आणि शेवटी कारवाई

तक्रारकर्त्याने वारंवार पत्रव्यवहार करून पोलीस पाटलाला निलंबित करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती.यानंतर प्रहार संघटनेने ऑक्टोबर महिन्यात प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणानंतर चौकशीचा वेग वाढला आणि प्रांताधिकारी माळी यांनी निलंबनाचे आदेश दिले.

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशातील प्रमुख मुद्दे – पोलीस पाटील अधिनियम 1967 मधील कलम 6, 10 व 11 चा भंग,प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन,पोलीस पाटील पदाच्या कार्यपद्धतीला गैरसोयीचे आचरण,कर्तव्यकसूर स्पष्ट दिसून येत असल्याने चौकशी प्रस्तावित त्यामुळे
चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ निलंबन करण्यात आले आहे आणि पदाचा चार्ज शेजारच्या गावच्या पोलीस पाटलांकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रांताधिकाऱ्यांनी या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येईल.

तक्रारकर्ते संजय राठोड यांची प्रतिक्रिया-
गावातील चुकीच्या कामांवर आवाज उठवल्यामुळे माझ्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस पाटीलच गुंडगिरी करत असल्याने प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली. प्रहार संघटनेने दिलेल्या सहकार्यामुळे मला न्याय मिळाला.

Leave a Reply

Back To Top