पंढरपूरच्या अनुराधा गाडेकर यांना उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार प्रदान
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ फेब्रुवारी: रोटरी क्लब पंढरपूर यांच्यावतीने वर्ष 2026 साठीचा उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार द लॅविष ब्युटी सलोन अँड इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा सौ अनुराधा गाडेकर यांना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते २५ तारखेला प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी भूषविले.यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ.वैभव सादिगले, सचिव मयूर परिचारक,डॉ. कैलास कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ.अनुराधा गाडेकर यांनी शून्यातून आपली व्यावसायिक वाटचाल सुरू करत सौंदर्यतज्ञ (ब्युटीशियन) म्हणून या क्षेत्रात विशेष नाव कमावले आहे. द लॅविष ब्युटी सलोन अँड इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून त्या अनेक महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लबकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्तीबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
