आंबवडे येथे महसूल विभागांतर्गत महाराजस्व अभियान राबविण्यात येणार 

आंबवडे भोरमध्ये १७ एप्रिलला महसूल समाधान शिबिर; ७/१२ दुरुस्ती ते पीएम किसानपर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी

उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर व तहसील कार्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

आंबवडे ता.भोर,जि. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज– महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर व तहसील कार्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत आंबवडे येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरात पार पडणार आहे.या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.या शिबिरात मालमत्ता फेरफार, ७/१२ व ८अ उताऱ्यांतील दुरुस्ती,तुकडाबंदी नियमितीकरण,जमीन वर्ग बदल, अकृषिक परवानगी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध प्रमाणपत्रे आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तसेच संजय गांधी,इंदिरा गांधी योजना,पीएम किसान,ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि तक्रार निवारण यासारख्या योजनांचाही समावेश आहे.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे,भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात,भोरचे तहसिलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top