प्राचार्य शिवाजीराव बागल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार; दीपस्तंभ कादंबरीचा गौरव

प्राचार्य शिवाजीराव बागल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार; दीपस्तंभ कादंबरीचा गौरव

लातूर साहित्य संमेलनात शिवाजीराव बागल यांचा सन्मान; ग्रामीण साहित्याला राज्यभर मान्यता

Pandhapur news: पंढरपूर | लातूर |ज्ञानप्रवाह न्यूज : लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव बागल यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीपस्तंभ या चरित्रात्मक कादंबरीस हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी आयोजित दुसरे मराठी साहित्य संमेलन २८ एप्रिल २०२६ रोजी लातूर येथे संपन्न होत असून, या संमेलनात बागल सरांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रा.डॉ.माधव गाडेकर,प्रा. श्रीधर गायकवाड,अंगद गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वाडी-कुरोली ता.पंढरपूर येथील ग्रामीण साहित्यिक म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी अल्पावधीतच आपल्या लेखनातून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याने ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडत वाचकांच्या मनात घर केले आहे. त्यांच्या साहित्याचा लौकिक महाराष्ट्राबरोबरच राज्याबाहेरही पोहोचला आहे.

यापूर्वीही त्यांच्या साहित्याला ४२ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान मिळालेले असून दीपस्तंभ कादंबरीस मिळालेला हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जात आहे. या यशामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Back To Top