मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

[ad_1]


पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधला. X वर अनेक पोस्ट करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस शासित राज्यांची अवस्था वाईट आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लबोल केला. तसेच पीएम  मोदींना हा हल्लाबोल केला कारण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्य युनिट्सने केवळ आर्थिकदृष्ट्या शक्य असलेली आश्वासने द्यावीत, असा सल्ला दिला होता. पीएम मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, खोटी आश्वासने देणे सोपे आहे, परंतु त्यांची नीट अंमलबजावणी करणे अवघड किंवा अशक्य आहे, हे काँग्रेस पक्षाला कळत आहे. प्रचारादरम्यान ते जनतेला अशी आश्वासने देतात जी त्यांना कधीच पूर्ण करता येणार नाहीत. तसेच आता काँग्रेस पक्ष लोकांसमोर वाईटरित्या उघड झाला आहे.

 

पंतप्रधानांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, देशातील जनतेला काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या खोट्या आश्वासनांची जाणीव ठेवावी लागेल. हरियाणातील जनतेने त्याचे खोटे कसे नाकारले आणि स्थिर, प्रगतीभिमुख आणि कामावर आधारित सरकारला प्राधान्य दिले हे आपण अलीकडेच पाहिले. तसेच काँग्रेसला मतदान करणे म्हणजे अराजकता, वाईट अर्थव्यवस्था आणि अभूतपूर्व लुटीला मत देणे. देशातील जनतेला काँग्रेस पक्षाच्या खोट्या दाव्यांऐवजी विकास आणि प्रगती हवी आहे असे देखील पीएम मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. तेलंगणातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.  याआधी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांनी काही भत्ते देण्याचे आश्वासन दिले होते ज्यांची पाच वर्षे अंमलबजावणी झाली नाही.  

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top