कार उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

[ad_1]


हातरस जिल्ह्यातील चांदपा येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका वर्षाच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चार जणांना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 

या प्रकरणाची माहिती देताना हाथरसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, चांदपा पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच कारमधील लोक बुलंदशहर जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळाला भेट देऊन आग्रा येथे जात होते. कारमध्ये एकूण आठ जण होते आणि ते सर्व आग्रा येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. कारचालकाचे नियंत्रण सुटून कार उलटल्याने हा अपघात झाला. 

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top