अशा परिस्थितीत मेगा लिलावाची तारीख डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ठेवली जाऊ शकते

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच लिलावासाठी ठिकाणाचे नाव जाहीर करू शकते


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) 2022 चा लिलाव फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आला होता, परंतु गेल्या दोन हंगामाचा लिलाव डिसेंबरमध्ये आयोजित केला जात आहे.2022 च्या लिलावाप्रमाणे मेगा लिलाव देखील 2 दिवसांसाठी आयोजित केला जाऊ शकतो. 2022 चा लिलाव फेब्रुवारीमध्ये झाला होता, तर पुढील 2 वर्षांसाठी ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात झाली होती. अशा परिस्थितीत मेगा लिलावाची तारीख डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ठेवली जाऊ शकते.इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुणसिंग धुमल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 पूर्वी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

2022 मध्ये झालेला शेवटचा मेगा लिलाव बंगळुरूमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण 2023 आणि 2024 चे लिलाव अनुक्रमे केरळ आणि यूएईमध्ये झाले.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच लिलावासाठी ठिकाणाचे नाव जाहीर करू शकते.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांनी बीसीसीआयकडे पगाराची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केलीय. 2023 ते 2024 पर्यंत पगाराची मर्यादा 5 टक्क्यांनी वाढवण्यात आली. म्हणजे 95 कोटींवरून 100 कोटींवर करण्यात आली होती. आता यामध्ये 20 टक्के आणखी वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी पगाराची मर्यादा किमान 10 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज आहे. म्हणजेच 10 संघांची एकूण पगाराची मर्यादा पाहिल्यास रक्कम 10 अब्ज रुपयांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.

2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावावर नजर टाकल्यास एकूण 204 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. या 204 खेळाडूंची एकूण किंमत 551 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे .आयपीएल क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 2025 च्या मेगा लिलावात खेळाडूंची संख्या आणखी वाढू शकते.

अध्यक्ष अरुणसिंग धुमल म्हणाले, प्रत्येक संघाला 3 ते 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल. फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 खेळाडू खरेदी करू शकते, त्यापैकी 8 परदेशी खेळाडू आहेत परंतु एक संघ या 8 परदेशी खेळाडूंपैकी केवळ 4 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतो. टी-20 विश्वचषक 2024 च्या यशस्वी आयोजनानंतर हे सुद्धा होऊ शकेल की अमेरिकेसह इतर अनेक देशांचे खेळाडूही लिलावात भाग घेतील.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading