लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्य पदी निवड

लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्यपदी निवड

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील खंदे समर्थक लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली‌.

सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक कल्याणाची कामे करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांनी यापूर्वी देखील विविध राजकीय पदे भूषवलेली आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले लक्ष्मण धनवडे यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सभापती म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.

लक्ष्मण धनवडे यांनी भारतीय जनता पार्टी च्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर असताना मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणी व धोरण अवलंबलेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठे काम केले आहे. या त्यांच्या कामाची दखल महाराष्ट्र राज्य भारतीय भाजपा पार्टीच्यावतीने घेऊन भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

लक्ष्मण तात्या धनवडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहून भाजपा पक्षाला बळकटी देण्याचे काम केले असून यापुढेही करत राहणार आहोत.सर्वसामान्य जनता,शेतकरी,कष्टकरी यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि यापुढे देखील कार्य करणार आहोत.या निवडीमुळे मला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

या निवडीबद्दल धनवडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार व आमचे नेते प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या संधीचे सोने करणार आहे.

Leave a Reply

Back To Top