घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एकूण ३,२९,०५३/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पालघर पोलीसांना यश स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांची उत्कृष्ट कारवाई
पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज- तारापुर पोलीस ठाणे हद्दित दि.०३/०६/ २०२५ रोजी रात्रौ ८.३० वाजता ते दि. ०४/०६/ २०२५ रोजी सायंकाळी ०४.३० वा. चे दरम्यान राधा बिल्डींग रुम नं.०२, गोकुळनगर, कुरगाव,ता. जि.पालघर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या रुमचे सेप्टी डोअर तसेच दरवाजाचे कुलूप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने उचकटुन कपाटामध्ये ठेवलेले सोन्या व चांदीचे दागिने चोरी केले म्हणून फिर्यादीचे तक्रारीवरून तारापुर पोलीस ठाणे येथे गुरनं ३३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये दि. ०४/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन त्वरीत पोनि/प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी साजीद अकबर शेख, वय ३४ वर्षे, धंदा चालक, रा अष्टविनायक चाळ रुम नं ००५, नागीनदास पाडा विरार रोड, नालासोपारा पुर्व ता. जि. पालघर,शावेज अनवर खान,रा.क्लासिक प्लाझा, यशवंत गौरव बिल्डींग, नालासोपारा पश्चिम यांना निष्पन्न करण्यात आले आहे. आरोपी क्र.१ साजीद अकबर शेख यास अटक करुन त्याचेकडून गुन्ह्यात गेलेला एकुण ३,२९,०५३/- रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिने असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्र.२ शावेज अनवर खान याचा अद्याप शोध सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर,उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर, प्रभारी अधिकारी निवास कणसे तारापुर पोलीस ठाणे, पोउपनिरी/स्वप्नील सावंत देसाई,पोउपनिरी/रविंद्र वानखेडे,पोउपनिरी/गोरखनाथ राठोड,पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/राकेश पाटील,पोहवा/संदीप सरदार, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/रामचंद्र तांबडा,पोअं/विशाल लोहार, पोअं/विशाल कडव,चापोअं/अवतार, पोअं/जितेंद्र वसावे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या पथकाने केली आहे.
