पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्य उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जलाबाबत

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

हजारो वर्षांची प्रथा परंपरा आणि श्रींच्या मूर्तीची संरक्षणाची गरज याचा समतोल साधत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राजोपचाराची परंपरा जपते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर दररोज करण्यात येणारे नित्योपचार (राजोपचार) हे प्रथा व परंपरेनुसार काटेकोरपणे पार पाडले जातात. मूर्तींचे संवर्धन व दीर्घकाळ संरक्षण व्हावे या दृष्टीने पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर केला जात असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

अभिषेकावेळी केवळ सात्विक जलाचा नाही तर श्री विठ्ठलावर नितांत श्रद्धा असणारे भाविक सेवाभावी तत्त्वावर जे गंगाजल अर्पण करतात, त्याचाही समावेश करण्यात येतो. याशिवाय, ग्रहणकाळात – म्हणजे ग्रहण लागलेले आणि सुटलेले स्नान घालताना – अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार चंद्रभागेचे जल वापरले जाते.

कोविड- 19 महामारीच्या काळातसुद्धा मंदिर समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या राजोपचारांमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही अथवा बदल केला नाही. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष प्रवेश नव्हता, तरीदेखील श्रींचे नित्योपचार, पूजा-अर्चा आणि पारंपरिक विधी अखंडितपणे सुरू ठेवले होते.

श्रीच्या राजोपचारात कोणताही बदल अथवा खंड करण्यात आलेला नाही, सर्व प्रथा व परंपरा कायम ठेवूनच हे उपचार पार पाडले जातात. मूर्तींचे रक्षण तसेच प्रथा व परंपरा हे दोन्ही घटक जपण्याची जबाबदारी मंदिर समिती जबाबदारीने पार पाडत आहे.

श्रींच्या नित्योपचारात परंपरेला कुठेही धक्का लागू दिला जात नाही. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार शुद्ध सात्विक जल वापरले जाते, परंतु त्यामध्ये गंगाजलाचा समावेश असतो. ग्रहणकाळात मात्र शास्त्रोक्त परंपरेनुसार चंद्रभागेचे पाणीच श्रींना स्नानासाठी अर्पण केले जाते. हजारो वर्षांची प्रथा परंपरा आणि श्रींच्या मूर्तीची संरक्षणाची गरज या दोन्हींचा समतोल साधत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राजोपचाराची परंपरा जपत असल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top