अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान; टाकळी–कासेगाव–अनवली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची दुरुस्ती

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः टाकळी-कासेगाव -अनवली मार्गावर पडलेले खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी स्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

या मार्गाचा अवजड वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कामाची तातडीने मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती उपअभियंता भीमाशंकर मेटकरे यांनी दिली.

तालुक्यातील नदीकाठच्या भागांतील रस्ते खराब झाले असून भीमा नदीवरील काही पुलांचे भरावे वाहून गेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रस्ते दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत. नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

Leave a Reply

Back To Top