पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 321 अर्ज मंजूर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/ २०२५ : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीचा महत्त्वाचा टप्पा मंगळवार, दि.18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले 8 ही अर्ज मंजूर झाले तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर, 39 अर्ज नामंजूर तर 6 अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली.सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवकपदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

अर्जांच्या छाननीची प्रक्रिया नगरपरिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशन मागे घेणे : 19 ते 21 नोव्हेंबर
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर
मतदान: 2 डिसेंबर
मतमोजणी: 3 डिसेंबर
अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
छाननी झालेले वेळापत्रक
11:00 – नगराध्यक्ष व प्रभाग 1
11:30 – प्रभाग 2
12:05 – प्रभाग 3 व 4
1:00 – प्रभाग 5 व 6
1:30 – प्रभाग 7 व 8
2:00 – प्रभाग 9 व 10
3:00 – प्रभाग 11 व 12
3:30 – प्रभाग 13 व 14
4:00 – प्रभाग 15 व 16
4:30 – प्रभाग 17 व 18





