मराठी पत्रकारितेने Marathi Patrakar Din लोकशाही सशक्त केली : शिवाजी शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन patrakar din साजरा.पत्रकारितेची भूमिका,आव्हाने व जबाबदाऱ्या यावर शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन.

Pandharpur news: पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या Rayat Shikshan Sanstha पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्रसिद्धी व फोटो समिती,राष्ट्रीय सेवा योजना समिती तसेच इंटायर मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन Marathi Journalism मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव उपस्थित होते.
वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार शिंदे,अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख समन्वयक डॉ. अमर कांबळे,कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ.दत्तात्रय चौधरी
पुण्यनगरीचे सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी व फोटो समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले.प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय प्रा.बालाजी फुगारे यांनी करून दिला.

पत्रकारिता : काल,आज आणि उद्या — शिवाजी शिंदे MarathiPatrakarDin
पत्रकारिता : काल,आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन करताना शिवाजी शिंदे म्हणाले,भारतासारख्या लोकशाही देशाला पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते विविध सामाजिक चळवळींपर्यंत पत्रकारितेने लोकशाही मजबूत केली आहे.आजच्या सोशल मीडियाच्या युगात नेरिटिव्ह तयार करून समाजमन घडवले जात आहे, ही बाब अत्यंत धोकादायक असून पत्रकारांनी याला बळी न पडता बातमी मागील सत्य समाजासमोर मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे.बदलत्या सामाजिक, आर्थिक व तांत्रिक परिस्थितीत विश्लेषणात्मक पत्रकारितेला अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषण – प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव म्हणाले की,मराठी पत्रकारितेला मोठा गौरवशाली इतिहास आहे. पत्रकारिता ही समाजात संभ्रम निर्माण करणारी नसून अचूक,वस्तुनिष्ठ व पुरेशी माहिती देणारी असावी. पत्रकारांच्या लेखणीचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो, त्यामुळे बातमीत प्रामाणिकपणा व वास्तवता असणे आवश्यक आहे. शेतकरी,विद्यार्थी व उद्योजक यांच्या समस्या मांडून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात विविध वर्तमानपत्रांचे संपादक,सहसंपादक, निवासी संपादक, उपसंपादक,वार्ताहर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक,कॅमेरामन व निवेदक यांचा गुलाबपुष्प,पेन व डायरी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रशांत वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ४० हून अधिक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विनया पाटील, प्रा. राजेंद्र मोरे,प्रा. संदीप बागल,प्रा.नितीन कांबळे,प्रा. दत्तात्रय खिलारे,अभिजित जाधव,अमोल माने,समाधान बोंगे,ओंकार नेहतराव यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रा.मोहिनी सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.धनंजय वाघदरे यांनी केले.






