आदिवासी महिलांसाठी न्यूक्लियस बजेटचा वापर करा; पुणे बैठकीत डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रशासनाला सूचना

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत आ.डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक;अवकाळी नुकसान, वाहतूक कोंडी आणि पर्यटन सुरक्षेचे मुद्दे ऐरणीवर

आदिवासी महिलांसाठी न्यूक्लियस बजेटचा वापर करा; पुणे बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रशासनाला सूचना

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाई, पुण्यातील वाहतूक कोंडी, पर्यटनस्थळी सुरक्षितता आणि आदिवासी महिलांसाठी न्यूक्लियस बजेटच्या वापराबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ मे २०२६: जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत शिवसेना नेत्या आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, नवले पुल तसेच पुणें शहर परिसरातील ब्लॅक स्पॉट्सबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. पर्यटनस्थळी मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटना व अपुऱ्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन रक्षक नेमण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आदिवासी महिला व अत्याचारग्रस्त मुलींसाठी न्यूक्लियस बजेटमधून तात्पुरत्या आर्थिक मदतीची यंत्रणा उभारण्याची सूचना केली.

यावर स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र वॉर्डन पुनश्च नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन स्थळी सुरक्षा रक्षक नेमणूक व न्यूक्लियस बजेटच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Back To Top