पंढरपुरात बालविवाह रोखण्यात निर्भया पथकाला यश; 17 वर्षांच्या मुलीचा विवाह ऐनवेळी थांबवला
दोन महिन्यांत सलग चौथा बालविवाह रोखला; पंढरपूर निर्भया पथकाची तत्पर कारवाई
पंढरपूर शहरातील एका नामांकित हॉलमध्ये होणारा बालविवाह निर्भया पथकाने तत्काळ कारवाई करून रोखला. दोन महिन्यांत चौथ्यांदा बालविवाह थांबवत पोलिसांनी सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला.

पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरातील एका नामांकित हॉलमध्ये होणारा बालविवाह निर्भया पथकाने तत्काळ कारवाई करून रोखला. दोन महिन्यांत चौथ्यांदा बालविवाह थांबवत पोलिसांनी सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.दि. १३/०५/२०२६ रोजी पंढरपूर विभागाच्या निर्भया पथकाच्या मोबाइल कं. ९११२२२६३५२ वर मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर शहर हद्दीत एका मोठ्या नामांकित हॉलमध्ये एक बालविवाह होत असल्याचे बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली असता तिथे मुलगी व तिचे नातेवाइक मिळून आले. नातेवाईक यांनी विवाह होत असलेबाबत नकार दिला, मात्र निर्भया पथकाने चौकशी करुन त्यांनी छापलेल्या पत्रिका नातेवाइकांना दाखवली व सोक्षमोक्ष लावत विवाह तत्काळ थांबविला. ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र घेवून आले असता तिचे वय हे १७ वर्षे १ महीने दिसुन आले व त्यानंतर तो होणारा विवाह तिचे आई वडीलांना समज देवुन तत्काळ रोखण्यात आलेला आहे व त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले.
निर्भया पथक पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की,आपल्या हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास आम्हास, निर्भया पथकास मो.नं.९११२२२६३५२ वर संपर्क करावा. यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल तसेच अशा लोकांची गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.
सदरची कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,पंढरपूर विभाग सहा.पोलीस अधिक्षक (भा.पो.से) प्रशांत डगळे,पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख म.पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव रावण, पोकॉ/१२३६ शशिकांत सावंत, पोकॉ/१३९५ लक्ष्मण कुचेकर,म.पोकॉ/१३११ निर्मला वाघमारे, म.पोकॉ/२०४८ काझी,पोना / ७१८ भगत,पोकॉ/२११५ चव्हाण यांनी पार पाडली.


