निदा खान प्रकरण : एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई

निदा खान प्रकरणात मोठी कारवाई; मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर

छत्रपती संभाजीनगरात पहाटेच महापालिकेची धडक; AIMIM नगरसेवकाचे घर जमीनदोस्त

निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप; मतीन पटेल अडचणीत
 बुलडोझर कारवाईवरून राजकारण तापले; इम्तियाज जलीलांचा संताप

TCS प्रकरणाचा संभाजीनगर कनेक्शन; नगरसेवकाच्या घरावर कारवाई

छत्रपती संभाजीनगर|ज्ञानप्रवाह न्यूज –छत्रपती संभाजीनगर येथे AIMIM एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल Matin Patel यांच्या कथित अवैध बांधकामांवर महापालिकेकडून बुधवारी सकाळी बुलडोझर कारवाई करण्यात आली. नाशिक मधील चर्चित TCS टीसीएस प्रकरणातील आरोपी Nida Khan निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून, त्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेने मतीन पटेल यांच्या घर, कार्यालय आणि इतर बांधकामांना यापूर्वी नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. नोटीसनंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र स्थगिती न मिळाल्याने प्रशासनाने सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.

माहितीनुसार, नारेगाव परिसरातील ज्या घरात निदा खान राहत होती, त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून तिला अटक केली होती. या प्रकरणात मतीन पटेल यांना सहआरोपी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

AIMIM एआयएमआयएम नेते Imtiaz Jaleel इम्तियाज जलील यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ही बुलडोझर कारवाई नसून न्यायाची अंत्ययात्रा आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगरातील AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या कथित अवैध बांधकामांवर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Back To Top