power crisis : देशात वीज संकट? अमित शहांची ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांसोबत बैठक


नवी दिल्लीः कोळशाची टंचाई आणि वीज संकटाबाबत राज्यांनी केंद्राकडे तक्रारी केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये होत असलेल्या या बैठकीला ऊर्जामंत्री आर. के. सिंह, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

महाराष्ट्र, बिहार, यूपी, दिल्ली, पंजाब, राजस्थान, केरळ आणि कर्नाटकसह अनेक राज्यांनी कोळशाच्या टंचाईवरून तक्रार केली आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून (एनटीपीसी) दिल्लीला ४,००० मेगावॅट वीज पुरवठा अर्धा केला आहे. यामुळे दिल्ली सरकारला गॅसवर आधारित महागडी वीज आणि बाजारातील उच्च दरावर वीज खरेदी करावी लागत आहे, असं दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.
बिहारच्या गरजेनुसार आम्ही NTPC कडून वीज घेतो किंवा खासगी कंपन्यांकडून घेतो. पण खासी कंपन्यांकडून आपेक्षित वीजपुरवठा केला जात नाहीए. यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. पण ही समस्या फक्त बिहारमध्येच नाही, तर देशातील इतर राज्यांमध्येही आहे, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.
देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांची गरज पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे. यामुळे वीज संकटाची शक्यता पूर्णपणे चुकीची आहे, असं कोळसा मंत्रालयाने रविवारी म्हटलं होतं. देशातील कोळशाचे उत्पादन आणि पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. वीज पुरवठ्यात व्यत्यय येण्याची कुठलीही शक्यता नाही. कोल इंडियाच्या मुख्यालयात ४३ दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. यातून २४ दिवसांची वीजेची मागणी पूर्ण करता येऊ शकते, असं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केलं.

Martina Navratilova: मोदींना ‘लोकशाही नेते’ म्हणणाऱ्या अमित शहांवर प्रसिद्ध खेळाडूची टिप्पणी चर्चेत

केरळ सरकार १९ तारखेला निर्णय घेणार

दरम्यान, केरळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याला १०० मेगावॅट वीजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजारातून अधिक दरावर वीज विकत घ्यावी लागत आहे. पण अशीच स्थिती राहिल्यास येत्या १९ तारखेला राज्यात लोडशेडींग करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री के. कृष्णमूर्ती यांनी सांगितलं.

lakhimpur kheri incident : लखीमपूर प्रकरणावर भाजपचे डॅमेज कंट्रोल; दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: