भाजपविरोधात फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी बोलायचं का?; आघाडीच्या मंत्र्यांवर राऊत संतापले


हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात
  • ईडी, सीबीआयला काश्मीरमध्ये पाठवण्याचं आव्हान
  • महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही सुनावलं!

मुंबई: ‘भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) सरकारची जी बदनामी केली जात आहे, प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते रोखण्याची जबाबदारी सरकारमधील सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी आता केवळ खुर्च्यांवर बसू नये. प्रतिहल्ले करावेत,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केलं.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. ‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व आघाडीच्या नेत्यांवर खालच्या दर्जाची टीका सुरू आहे. कमी प्रतीचा गांजा विरोधकांनी मारल्यामुळं अशा प्रकारे टीका केली जात आहे,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.

वाचा: ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर भयंकर अपघात; सहा वाहने एकमेकांना धडकली, ३ ठार

‘सरकारवर होणाऱ्या टीकेला केवळ शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांनीच उत्तर द्यायचं का? सत्तेत बसलेल्या व सत्ता भोगणाऱ्या सर्वांची ती जबाबदारी आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता शांत राहू नये. हल्ल्या प्रतिहल्ला आणि टोल्याला प्रतिटोला हाणावा. किंबहुना आता सर्व मंत्र्यांना बोलावंच लागेल. तसं झालं तर भाजपवाले आठ दिवसांत पळून जातील,’ असं संजय राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा, आम्ही कागदपत्रं देतो!

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. ‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहेत. दहशतवाद्यांनी तिथं उच्छाद मांडला आहे. रोजच्या रोज काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून होत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर खुलासा करायला हवा,’ अशी मागणी राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्रातील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या विरोधात उठसूट आरोप करणारे किरीट सोमय्या व छापे टाकणाऱ्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय व एनसीबीसारख्या संस्थांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. ते खूप पॉवरफुल आहेत. त्यांना दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती द्यायला, कागदपत्रे द्यायला आम्ही तयार आहोत,’ असं राऊत यांनी सुनावलं.

वाचा: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सिंहगड एक्सप्रेस पुन्हा सुरूSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: