फेस्टिव्ह सेलमधील शाॅपींग; जाणून घ्या कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, नो कॉस्ट’ईएमआय’चा फंडा


मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि त्यानिमित्ताने खरेदीलाही सुरुवात झाली आहे. सध्या ऑनलाईन मार्केट आणि ऑफलाईन स्टोअर्समध्ये भरपूर खरेदी होत आहे. वेगवेगळ्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना सूट, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याचे पर्याय दिले जात आहेत. सणासुदीची ही खरेदी करण्यापूर्वी कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि नो कॉस्ट ईएमआयबद्दल अधिक जाणून घ्या.

पेट्रोल-डिझेल ; चार दिवस दरवाढ केल्यांनतर कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
कॅशबॅक
कॅशबॅक म्हणजे पैसे परत मिळण्याची संधी. ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर, त्याने दिलेल्या पैशांतील काही भाग ग्राहकाला परत केला जातो. सवलत एकूण पेमेंटमधून कापली जाते, तर उर्वरित रक्कम भरावी लागते. पण कॅशबॅकमध्ये आधी पूर्ण पैसे भरावे लागतात, त्यानंतर कॅशबॅक परत येतो.

वाचा :एसी रेल्वेपेक्षा विमान प्रवास होणार स्वस्त; आजपासून १०० टक्के आसन क्षमतेने उड्डाणे
सणासुदीच्या काळात निवडक मोबाईल वॉलेट किंवा बँक कार्डद्वारे उत्पादनांच्या खरेदीवर कॅशबॅक दिला जातो. कॅशबॅक त्वरित असल्यास, ते त्वरित ग्राहकाच्या मोबाइल वॉलेटमध्ये किंवा लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जाते. झटपट कॅशबॅक सेवा नसेल, तर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी २४ किंवा ४८ तासांचा कालावधी असतो.

मोठ्या पडझडतीतून सावरले; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने-चांदी
कॅशबॅकशी संबंधित हे मुद्दे लक्षात ठेवा
कधीकधी कंपन्या कॅशबॅकसाठी किमान खरेदीची रक्कम ठरवतात. जर ग्राहकाला कॅशबॅक मिळवायचा असेल, तर त्याला त्या किमान रकमेपर्यंत खरेदी करावी लागेल, अन्यथा कॅशबॅक लागू होणार नाही. विक्रीवेळी उत्पादनाची किंमत वाढवून कॅशबॅक दिला जात नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाच्या किंमतीची तुलना करा.

रिवॉर्ड पॉईंट
अनेक वेळा ग्राहकांना विक्रीमध्ये कॅशबॅकऐवजी रिवॉर्ड पॉइंट दिले जातात. उदाहरणार्थ, प्रत्येक १०० रुपयांच्या पेमेंटसाठी १ रिवॉर्ड पॉईंट आणि १ रिवॉर्ड पॉईंट म्हणजे १ रुपये. रिवॉर्ड पॉइंट्सला एक प्रकारचा कॅशबॅक म्हटले जाऊ शकते, फक्त फरक एवढाच आहे की, रिवॉर्ड पॉइंट्स फक्त पुढील खरेदीच्या वेळी रिडीम करता येतात. रिवॉर्ड पॉइंट ऑफर करणे म्हणजे ग्राहकाला पुन्हा खरेदीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न होय.

रिवॉर्ड पॉइंट्सच्या मदतीने मोफत खरेदीची संधी
काही कंपन्या किंवा प्लॅटफॉर्म ही सुविधा पुरवतात. जर रिवॉर्ड पॉइंट्सची रक्कम पुढील खरेदीमध्ये भरल्या जाणाऱ्या रकमेच्या बरोबरीची असेल, तर संपूर्ण खरेदी फक्त रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करूनच करता येते. म्हणजेच, ग्राहक एकही पैसा न देता या रिवॉर्ड पॉइंट्सवरून खरेदी करू शकतो. तर काही कंपन्या १० किंवा २० टक्के रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करण्याबाबत अटी ठेवतात.

चूक सुधारण्याची संधी ; या कारणामुळे इक्विटी फंडात गुंतवणूकदारांचे अडकलेत २ लाख कोटी
नो कॉस्ट ईएमआय
जेव्हा तुम्हाला एखादे उत्पादन खरेदी करायचे असते, पण तुम्ही एकरकमी पैसे देऊ शकत नाही, तेव्हा ईएमआय सेवेचा वापर करा. ईएमआयवर व्याजही भरावे लागते. त्यामुळे एकरकमी पेमेंट खरेदीच्या तुलनेत ईएमआयवर खरेदी करणे थोडे महाग पडते. आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू आहेत. नो-कॉस्ट ईएमआय/झिरो कॉस्ट ईएमआय वगैरे. नो-कॉस्ट ईएमआयमध्ये ग्राहकाला ईएमआयमध्ये फक्त उत्पादनाची किंमत द्यावी लागते आणि कोणतेही व्याज आकारले जात नाही. म्हणजेच तुम्ही ईएमआय वर दहा हजार रुपयांची वस्तू खरेदी केली असेल, तर दहा हजार रुपयेच भरावे लागतील.

जीडीपीत होणार सुधारणा; ‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला
नो-कॉस्ट ईएमआयची वस्तुस्थिती
नो-कॉस्ट ईएमआय हा ग्राहकांना भुरळ घालण्याचा एक मार्ग आहे. नो-कॉस्ट ईएमआयमध्ये व्याज किंवा खर्च देखील असतो, पण ते ग्राहकांना दिसत नाही. नो-कॉस्ट ईएमआयवर व्याज आकारण्याचे कारण हे देखील आहे की, आरबीआय शून्य टक्के व्याजास परवानगी देत नाही. सामान्य ईएमआयमध्ये भरलेल्या व्याजाप्रमाणेच कंपन्याही व्याज मोजतात, ज्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कंपन्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायासोबत उत्पादनाच्या एकवेळच्या देयकावर सूट देतात. जर नो-कॉस्ट ईएमआय निवडला असेल, तर उत्पादन पूर्ण किंमतीत खरेदी करावे लागेल. दुसरे म्हणजे व्याज हे उत्पादनाच्या किंमतीतच समाविष्ट केले जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: