
पीडितेशी थेट संपर्क करत सर्वतोपरी मदतीचे विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांचे आश्वासन
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पीडित महिलेच्या मदतीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे तत्पर ॲड.संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून पीडितेशी थेट संपर्क,सर्वतोपरी मदतीचे आश्वासन अंबाजोगाई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ एप्रिल २०२५ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील, सोनगाव येथे वकिली करणाऱ्या महिलेवर गावच्या सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली. ध्वनि…