पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरी कडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल

पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरीकडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. ०७/०२/२०२५- पत्नीला नांदविण्यासाठी पाठवणार नाही तिचे दुसरे लग्न लावून देणार आहोत असे सांगून वारंवार फोन करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा पती राजेश बाळू शिंदे वय 25,रा.खडकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेश दुर्योधन काळे,मिथुन दुर्योधन काळे,वैशाली दुर्योधन काळे सर्व रा.औसारी ता.इंदापूर या तिघांविरुध्द मंगळवेढा पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती प्रमाणे, यातील फिर्यादी दिलमाबाई बाळू शिंदे वय 65,रा.खडकी यांचा मयत मुलगा राजेश बाळू शिंदे वय 25 याला त्याचे मेव्हुणे तथा वरील आरोपी सुरेश काळे, मिथुन काळे,पत्नी वैशाली आदींनी वारंवार फोन करुन पत्नी वैशाली हिस आम्ही नांदवण्यास पाठविणार नाही, तिचे दुसरीकडे लग्न करुन देणार आहोत,तु आमचेकडे यायचे नाही,आलास तर बघ असे म्हणून शिवीगाळी,दमदाटी करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून त्याला दि.2 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता आत्महत्येस प्रवृत्त केले.मयताने राहते घरी दोरीच्या सहाय्याने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे दिलमाबाई शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Back To Top