श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण.

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : मुंबई येथील भाविक डॉ एम एस अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ एम एस अल्वा यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.

या महावस्त्रामध्ये सोवळे, उपरणे,अंगी, नऊवार साडी, बेडशीट,पिलो कव्हर इत्यादीचा समावेश आहे.डॉ.अल्वा हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून मागील अनेक वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा महावस्त्रे व वस्तू श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत.

Leave a Reply

Back To Top