सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा

सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन

भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज – पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने संपुर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, औद्योगिकरण व त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण या गंभीर प्रश्नाबाबत जनजागृती व्हावी म्हणुन केंद्र सरकारच्या पर्यावरण ,वणे व वातावरणीय बदल मंत्रालयाने दि.22 में 2025 ते दि.5 जुन 2025 या कालावधीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत समाजातील सर्व स्तरावर जनजागृतीसाठी स्वच्छता मोहिम ,वृक्षारोपन व प्रदुषण नियंत्रणाबाबत व्याख्याने असे विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिल्याने कारखाना परिसरात कारखान्याचे जेष्ठ कामगार श्रीधर रणवरे,विठठल आडत,बबन सोनवले व विष्णु खवणकर यांचे हस्ते विविध प्रकारची रोपे लावून वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

तसेच कारखाना परिसर स्वच्छता मोहिम राबवुन संपुर्ण कारखाना परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे,व्हा.चेअरमन भारत कोळेकर,संचालक मोहन नागटिळक, प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top