क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार – आ.समाधान आवताडे

मतदारसंघाचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार-आ समाधान आवताडे

तालुका क्रीडा समितीची आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल समितीची संयुक्त बैठक तहसील कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न झाली. मतदारसंघातील दर्जेदार क्रीडा परंपरेची ऐतिहासिक कामगिरी पाहता अद्यावत क्रीडा सुविधायुक्त संकुलाची उभारणी करणे व शासनाकडून निधी मंजूर करून घेण्याबाबत आमदार आवताडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

भव्य दिव्य आणि प्रशस्त क्रीडा स्टेडियम उभा करण्याच्या अनुषंगाने जागेची पाहणी करून आवश्यक त्या मागण्यांसह लवकरात लवकर प्रस्ताव तयार करणे, सुधारित शासन निर्णयानुसार पंढरपूर व मंगळवेढा येथे क्रीडा संकुल उभा करण्यासाठी जागेची पाहणी करून प्रस्ताव तयार करणे,दोन्ही तालुक्या तील अनेक गुणवंत खेळाडूंना संबंधित खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी व नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक सोयी सुविधा त्याचबरोबर प्रशस्त मैदान उपलब्ध करून देणे.

यावेळेस मंगळवेढाचे प्रांतअधिकारी बी.आर.माळी, मुख्याधिकारी रोकडे,चरण कोल्हे, तहसीलदार मदन जाधव,पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगोटे,क्रीडा अधिकारी श्रीमती गाडवे, माजी प्राचार्य प्रा.येताळा भगत रामचंद्र दत्तू तसेच सर्व संबंधित अधिकारी सदस्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top