द.ह.कवठेकर प्रशालेच्या सार्थक लेंगरेची राष्ट्रपती पारितोषिकासाठी निवड
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेचा इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सार्थक सिद्धेश्वर लेंगरे याची निवड 15 जून 2025 रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात ज्युनिअर गट (मराठी भाषा) यामध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून झाली होती.
टाटा बिल्डिंग इंडिया नेशन या कंपनीद्वारे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरती निबंध स्पर्धा घेतली जाते.देशभरातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात.या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या शोध निबंधास राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेच्या निवडीचे तीन राऊंड असतात. स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सी.बी. आय.मार्फत गुप्त चौकशी केली जाते व त्यानंतरच अंतिम निवड केली जाते.

या स्पर्धेत सार्थक लेंगरे यांने घन कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन हा शोध निबंध सादर केला होता.यासाठी सार्थकला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पोरितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे.
सार्थक लेंगरे हा द.ह.कवठेकर प्रशालेचा गुणवंत विद्यार्थी असून यापूर्वी त्याने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. तसेच द.ह.कवठेकर भूषण पुरस्कार, विविध निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला परीक्षा,प्रज्ञाशोध परीक्षा व नुकत्याच झालेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा यात धवल यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यास मार्गदर्शन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक समीर दिवाण सर यांनी केले.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एस आर पटवर्धन सर,अध्यक्ष नाना कवठेकर,चेअरमन वीणा ताई जोशी, पदाधिकारी एस पी कुलकर्णी सर,डॉ.मिलिंद जोशी सर, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर , उपमुख्याध्यापक एम आर मुंडे सर, पर्यवेक्षक आर एस कुलकर्णी सर आदींनी सार्थक यांच्या यशाचे कौतुक व अभिनंदन केले.मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांनी सार्थक याचा सत्कार केला.

