कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यास घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे

कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यातील मौजे लामाणतांडा येथील पोलीस पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी प्रहार संघटनेने उजेडात आणल्या आहेत.त्या पोलीस पाटलां विरुध्द बोगस डॉक्टरकी दारू धंदे,मन्ना नावाचा जुगार चालवत असलेला व्हिडिओ डोणज, नंदुर, कात्राळ , कर्जाळ, लमाणतांडा या गावातील नागरिकांना माहिती असूनही ही प्रकरणे दाबली गेल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.या पोलीस पाटीलांवर भांडणे मारामारी असे अनेक प्रकारचे गुन्हे आहेत तरीही ते पोलीस पाटील कसे असा प्रश्न थेट प्रांताधिकारी यांना प्रहार संघटनेने विचारला आहे.

आता जे पोलीस अधिकारी या पोलीस पाटीलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्याविरुध्दही प्रहार आवाज उठवणार आहे असे संघटनेकडून सांगितले जात आहे.

तसेच भालेवाडी चे पोलीस पाटील यांच्या बाबतही तक्रारी असून त्यांनी तर खुद्द शासनाची फसवणूक करत ठेकेदारी सुरु केली आहे.त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा देऊन ठेकेदारी हा व्यवसाय करावा असे असताना ते दोन्ही करत आहेत. त्यांनी मारोळी येथे विविध बांधकाम क्षेत्रातील अनेक छोटी मोठी शासकीय कामे अनेक वर्षे झाली करत आहेत त्यामुळे त्यांचीही हकालपट्टी करणे गरजेचे आहे असे सांगत पोलीस पाटील पदावर असताना कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यायचा नसतो असे असताना जणू स्वतः निवडणूक लढवीत आहोत अशा पध्दतीने ते भाग घेत असतात. त्यामुळे या दोघांचीही गैरवर्तणूक सिद्ध झाली असून प्रांताधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी प्रहार संघटनेने रीतसर मागणी केली आहे.

त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील २९ पोलीस पाटील हे प्रहार संघटनेच्या रडारवर आहेत असे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.यावेळी निवेदन देतेवेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी,तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,सचिन सरवदे,अण्णासो पाटील,रोहिदास कांबळे आदी उपस्थित होते.कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Back To Top