जिल्हाधिकारी हटाव, पंढरपूर बचाव — तिर्थक्षेत्र बचाव समितीचा एल्गार
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १ नोव्हेंबर २०२५: पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव कृती समितीने आज जिल्हाधिकारी हटाव… पंढरपूर बचाव अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्यांच्या वर्तनावर गंभीर आरोप केले.

आज शनिवार श्री विठ्ठल मुर्तीसंरक्षक संत प्रल्हाद महाराज समाधी येथे दुपारी १.३० वाजता व्यथित नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडल्या.यावेळी पंढरीरायाच्या चरणी प्रार्थना करून राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांना सुबुद्धी लाभावी, अशी सद्भावना व्यक्त करण्यात आली.
बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या मनमानी, विभाजनकारी नीती, धमकीची भाषा आणि लोकशाही मूल्यांचा अवमान या मुद्द्यांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. समितीने सांगितले की लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांची एकजूट फोडण्याचा प्रयत्न हा इंग्रजकालीन मानसिकतेचा प्रत्यय आहे.
तसेच पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी वापरलेली दमबाजीची भाषा,अवैध धंदे करणाऱ्यांसारखी असल्याचा आरोपही समितीने केला.पंढरपूर शहरात अवैध धंदे, वाळू उपसा आणि झोपडपट्टी निर्मिती यावर इंटेलिजन्स डिपार्टमेंट गप्प बसते मात्र न्यायप्रिय नागरिकांवर दडपशाही केली जाते,असा आरोप समितीने केला.
शेवटी समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली की – लोकशाही,संविधान आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी अशा जिल्हाधिकार्यांना तात्काळ हटवावे.
जिल्हाधिकारी हटाव,पंढरपूर बचाव! विठ्ठलभूमी बचाव अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले
पंढरपूर बचाव समितीचा एल्गार — जिल्हाधिकारी हटावची जोरदार मागणी

