महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्राम विकास संस्थाचे कार्य मोलाचे- नंदिनी आवडे

राज्यस्तरीय महिला हक्क परिषदेत नंदिनी आवडे यांचे प्रतिपादन : महिलांच्या उन्नतीत एकताचा हातभार

महिलांनी संकटावर मात करून यशस्वी व्हावे- राज्य महिला आयोग सदस्य सचिव नंदिनी आवडे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकता संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी — समाज कल्याण विभागाचा गौरव

महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्राम विकास स्वयंसेवी संस्थेचे कार्य मोलाचे : नंदिनी आवडे

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.३० ऑक्टोबर : एकल महिलांच्या आयुष्यात असलेले अनेक प्रश्न महत्वाचे आहेत.महिलांच्या जीवनमानात अनेक गोष्टीना सुधारणा करण्यास वाव आहे. समाजाने महिलांना अधिक उंचीवर स्थान दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या संकटाला न घाबरता त्यांनी त्यावर मात करून जीवनात यशस्वी होण्याचा ध्यास धरला पाहिजे. राज्य महिला आयोग आवश्यक ते सहकार्य यासाठी करत आहे.त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नात शासनासोबतच एकता ग्राम विकास ही स्वयंसेवी संस्था करीत असलेले कार्य देखील अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे महिलांची जीवनशैली सुधारण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आज राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी येथे व्यक्त केले.

सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण पुणे आणि एकता ग्राम विकास संस्था यांनी राज्यस्तरीय एकल महिला परिषदेचे आयोजन केले होते.यासाठी विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्यांनी सांगितले की,या परिषदेने महिलांच्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात मदतच होणार आहे. केरळमधील महिलांना एकाचवेळी सर्व आवश्यक कागदपत्र,प्रमाणपत्र उपलब्ध केली जातात. अशा प्रभावी कल्पना महाराष्ट्रात ही राबविता याव्यात,एकल महिलांसाठी अभ्यास दौरा नियोजन करावे. राज्यात महिलांची तालुकानिहाय माहिती घेण्यासाठी राज्यपातळीवर समिती तयार करावी.एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या भागात आणखी उपक्रम घेऊन कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी.या विषयातील अनुभवांचे विचारांचे जतन व नोंदीकरण यासाठी एकता संस्थेने पुढाकार घ्यावा,अशी सूचना त्यांनी केली.

महिला बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे यांनी महिला बाल विकासच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

महिला बाल विकास उपायुक्त सुवर्णा पवार यांनी यावेळी महिलांच्या विकासात दिलेल्या कामाबाबत माहिती दिली आणि एकता संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

यशदाचे माजी संचालक रविंद्र चव्हाण यांनी या परिषदेचे संचालन केले. महिलांच्या विकासात केलेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीचे अनुभव त्यांनी सांगितले.एकता एकल महिला हक्क समितीच्या माध्यमातून यापुढे राज्यभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या विकासात राज्य पातळीवर काम करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगत एकता संस्थेच्यावतीने अनेक पातळीवर प्रभावी कार्य करणार असल्याचे संस्थेच्या संचालिका रोहिणी सानप निंबोरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित महिलांची विविध विषयांवर चर्चा झाली. महिला विकासासाठी करावयाच्या अपेक्षित उपाययोजना बाबत मुद्दे चर्चेतून समोर आले.

या परिषदेला पुण्यातून सामाजिक कार्यकर्त्या स्वाती देशपांडे,शाहीन शिंदे, ज्योती चांदेरे,प्राजक्ता साळी,अश्विनी खंदारे,मोनाली मेहत्रे,अनिल बोरकर,रेखा दुधाने,गौरी सोनवणे,पौर्णिमा गादिया,साधना महामुनी,सारिका थोरात, उषा भिंगारे,जागृती गायकवाड,शैलजा चौधरी महानंदा डाळिंबे,अर्चना झेंडे,स्मिता लोंढे, तर कोल्हापुरातून शिल्पा सुतार,नाशिकहून विद्या कसबे,रविशंकर सोनावणे,सातारा जिल्ह्यातून राजश्री चव्हाण,समिंदरा जाधव,राजश्री जाधव, सोलापूरच्या अमिता जगदाळे,चंद्रपूरहून अर्चना नांदुरकर, रायगड जिल्ह्यातून सुप्रिया जेधे,रत्नागिरीच्या पत्रकार जान्हवी पाटील, नवी मुंबईच्या वैशाली घोरपडे,शिर्डी येथील संजया उदमले,वैष्णवी दळवी,नीता गायकवाड आदिसह संस्था प्रतिनिधी,महिला आयोगा च्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर या परिषदेला आवर्जून उपस्थित होते.

एकता ग्राम विकास संस्थेच्यावतीने अध्यक्ष चंद्रकांत भोसले, उपाध्यक्ष मोहन गायकवाड,सचिव संदीप बगाडे, सदस्य अनंत भोसले, खजिनदार प्रतिभा भोसले यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर लोंढे यांनी केले.

Leave a Reply

Back To Top