भक्तीतून समाजजागृतीचा दीप- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनंत विचार चा विशेषांक प्रकाशित
भक्ती,वारी आणि विचारांचा संगम — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी वारी विशेषांक चे पंढरपूरात प्रकाशन
अनंत विचारने वारकरी परंपरेत घडवला नवा अध्याय — एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेषांकाचे प्रकाशन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर- वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय वातावरणात आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशासह कार्तिकी वारी विशेषांक चा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख ओंकार बसवंती,महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती तसेच साप्ताहिक अनंत विचार न्यूज नेटवर्क चे संपादक नागेश आदापुरे व त्यांची टीम उपस्थित होती.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी परंपरेतील भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेचा गौरव करत अनंत विचार साप्ताहिकाच्या समाजप्रबोधन कार्याचे कौतुक केले.
संपादक नागेश आदापुरे यांनी मान्यवरांचे आभार मानत आगामी काळात समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

