माध्यम क्षेत्रात नव्या उंचीची भरारी — विक्रम नाईकनवरे यांना मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्रथम श्रेणीत
ज्ञानाची मुक्त वाट — विक्रम नाईकनवरे

नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे/जून २०२५ परीक्षेत विक्रम राजराम नाईकनवरे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम (G15) ही तीन वर्षांची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आहे. शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवून त्यांनी माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्रानुसार विक्रम नाईकनवरे यांना पुढील दीक्षांत समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे.
नाशिकातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत विक्रम राजराम नाईकनवरे यांनी पत्रकारितेतील पदवी (B.A. in Mass Communication & Journalism) प्रथम श्रेणीत मिळवून आपले यश सिद्ध केले आहे.मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

