मंगळवेढ्यात hit and run; Motorcycle Accident Maharashtra अज्ञात चारचाकीच्या धडकेत 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, चालक फरार

मंगळवेढ्यात hit and run;Motorcycle Accident Maharashtra अज्ञात चारचाकीच्या धडकेत 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, चालक फरार

हुन्नुर–लोणार रस्त्यावर भीषण अपघात; चारचाकी वाहनाच्या धडकेत ऊसतोड मजुराचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील हुन्नुर–लोणार रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक देऊन 19 वर्षीय किरण सावंत याचा मृत्यू झाला. मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: Mangalwedha Hit and Run Case मंगळवेढा तालुक्यातील हुन्नुर–लोणार रस्त्यावर झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. Hunnoor Lonar Road Accident या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1086/2025 अन्वये Mangalwedha Police Crime News अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,दि. 08 नोव्हेंबर 2025 रोजी दु.3 वाजण्याच्या सुमारास हुन्नुर गावाच्या हद्दीत हुन्नुर ते लोणार जाणाऱ्या रस्त्यावर अनंत वाकसे यांच्या शेताजवळ मोटारसायकलस्वार किरण सुभाष सावंत वय 19, व्यवसाय – ऊसतोड मजूर,रा.अरळी ता.मंगळवेढा हे आपल्या होंडा युनिकॉर्न MH 13 ED 1917 या मोटारसायकलवरून जात होते.याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने MH 13 AZ 5638 Hit and Run Accident Solapur रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात किरण सावंत गंभीर जखमी झाले असून अपघात स्थळीच त्यांचा मृत्यू झाला.Motorcycle Accident Maharashtra अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.

प्रातिनिधिक फोटो

या घटनेप्रकरणी मृत युवकाची आई शिलाबाई सुभाष सावंत वय 40,व्यवसाय – ऊसतोड मजूर,रा.अरळी यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात चालका विरोधात BNS कलम 106(1), 281, 125(A)(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134(A)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1166 श्री कोष्टी हे करत असून फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Back To Top