द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी

द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी

आंतरराष्ट्रीय गुणांक बुद्धिबळ स्पर्धा : जय योगेश अनेराव याने मिळवले 1490 ELO रेटिंग

पंढरपूरच्या द. ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी चि. जय योगेश अनेराव याची आंतरराष्ट्रीय गुणांक बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी; 1490 ELO रेटिंगसह उल्लेखनीय यश.

Pandharpur sports news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी जय योगेश अनेराव इयत्ता ९ वी ‘ई’ याने पुणे व सोलापूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गुणांक बुद्धिबळ स्पर्धेत (Rapid प्रकार) उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत विविध देशांतील तसेच आंतरराष्ट्रीय गुणांक (ELO) प्राप्त बुद्धिबळपटूंचा पराभव करत जय अनेराव याने 1490 आंतरराष्ट्रीय ELO रेटिंग प्राप्त केले आहे.अल्पवयात मिळवलेले हे यश पंढरपूर शहरासाठी तसेच द.ह.कवठेकर प्रशालेसाठी गौरवास्पद मानले जात आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदांनी जय अनेराव याचे अभिनंदन केले आहे.

भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरा वरील स्पर्धांमध्ये अधिक मोठे यश मिळवून प्रशालेचे व पंढरपूरचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या आहेत.

जय अनेराव याच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ खेळाविषयी उत्साह निर्माण झाला असून, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Back To Top