इराण-इराक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क; नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

इराण-इराक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क; नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

SolapurNews:सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज: इराण-इराक दरम्यान संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, इराण किंवा इराक येथे नातेवाईक अथवा परिचित वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास संबंधितांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्र (EOC) यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे. कोणतीही चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क करून आवश्यक माहिती संबंधित नागरिकांना कळविण्यात येणार आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर नियंत्रण कक्ष : 0217-2731012
सोलापूर पोलीस शहर नियंत्रण कक्ष : 0217-2744600 / 2744620
सोलापूर पोलीस ग्रामीण नियंत्रण कक्ष : 0217-2732000
मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Back To Top