पंढरपूर तालुक्यात निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

पंढरपूर तालुक्यात निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

जिल्हा परिषद गटासाठी 87 तर पंचायत समिती गणासाठी 70 नामनिर्देशन पत्रांची विक्री

पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, मात्र जिल्हा परिषदसाठी 87 व पंचायत समितीसाठी 70 नामनिर्देशन अर्जांची विक्री.

Pandharpur zp panchayat samity election: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १६ जानेवारी – पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवार, दि.16 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

तहसीलदार सचिन लंगुटे

मात्र पहिल्या दिवशी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्जांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. जिल्हा परिषद गटासाठी एकूण 87 नामनिर्देशन अर्ज (फॉर्म) विक्री झाले असून, पंचायत समिती गणासाठी 70 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून, उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

नामनिर्देशन अर्ज दाखल : 16 ते 21 जानेवारी 2026
अर्जांची छाननी : 22 जानेवारी 2026
अर्ज माघार कालावधी : 23 ते 27 जानेवारी 2026
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 27 जानेवारी 2026
मतदान : 5 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
मतमोजणी : 7 फेब्रुवारी 2026
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने राजकीय हालचालींना लवकरच वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, मात्र जिल्हा परिषदसाठी 87 व पंचायत समितीसाठी 70 नामनिर्देशन अर्जांची विक्री.

Leave a Reply

Back To Top