नाशिक इंटरनॅशनल भाषा कॉन्फरन्समध्ये डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णी यांचा सत्कार

नाशिक इंटरनॅशनल भाषा कॉन्फरन्समध्ये डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णी यांचा सत्कार

Nashik news:नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय यांच्यावतीने आयोजित इंटरनॅशनल भाषा कॉन्फरन्स मध्ये लेखक कवी डॉ.जगदीश चंद्र कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. ही आंतरराष्ट्रीय परिषद 18 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान नाशिक येथे संपन्न झाली.

या परिषदेत डॉ.कुलकर्णी यांनी भाषा समस्या या विषयावर सखोल विचार मांडत उपस्थित विद्वानांचे लक्ष वेधले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.परिषदेत त्यांना बॅज,सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सत्कार सोहळ्यात आयआयटी मुंबई चे चीफ डायरेक्टर डॉ.मल्हार कुलकर्णी, संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. तिवारी,भोपाळ संस्कृत विश्वविद्यालय चे उपकुलगुरू डॉ.गोविंद पांडेय तसेच भाषा परिषदेचे उपनिदेशक डॉ.सूर्यप्रसाद उपस्थित होते.यावेळी सभागृहातील सर्व मान्यवरांनी उभे राहून डॉ.कुलकर्णी यांना मानवंदना दिली.

यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्येही डॉ.कुलकर्णी यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्या परिषदेला Narendra Modi यांनी उद्घाटन केले होते. तसेच 22 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान वरळी येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान सेमिनारमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला.

डॉ.कुलकर्णी यांनी आतापर्यंत 252 हून अधिक विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेत 32 पेक्षा अधिक संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विविध राज्यांत त्यांचा मंत्री,संचालक व साहित्यिकांच्या हस्ते गौरव झाला आहे. त्यांच्या शेकडो लेख, कथा व कविता विविध वृत्तपत्रे व मासिकांत प्रकाशित झाले असून भारत दर्शन हे त्यांचे पुस्तकही विशेष गाजले आहे.डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णी यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Back To Top