स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील यांची नियुक्ती


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : स्वाभिमानी मराठा महासंघाचा देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा, फक्त मराठा म्हणून एकत्र या हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ चळवळ उभी करत असुन मराठा आरक्षण, शिवस्मारक, मराठा समाजातील बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव अशा विविध विषयांवर संघटना कार्यरत आहे .याच विषयावर मराठा तरुणांमध्ये जनजागृती व्हावी व मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील लखन वसंत घाडगे पाटील यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नुकतेच स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील नियुक्ती पत्र दिले.

लखन घाडगे पाटील निवडीनंतर म्हणाले की, मराठा समाजातील तरुण ऐतिहासिक काळापासून लढाऊ आहेत त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करीन. शेतकरी प्रश्न हातात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटना कार्य करेल.

लखन घाडगे पाटील यांच्या नियुक्तीचे स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी,महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार,प्रदेशाध्यक्ष गौरव पवार,कार्याध्यक्ष दिपक पवार,शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे,युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मायाताई देशमुख,प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, , युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे जिल्हा अध्यक्ष अलका सोनवणे,पुणे शहर अध्यक्ष सविता खोजे, हवेली तालुकाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे,आदिंनी केले आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading