विशेष आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे संपन्न
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मेळावा तथा आरोग्य शिबिर RBSK 2.0
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५- आज १२/०३/२०२५ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मेळावा तथा आरोग्य शिबिर (RBSK 2.0 ) या मोहिमेंतर्गत Tongue tie operative camp व speech therapy/OAE/audiometry असे एकूण 13 पेशंट
8 OAE ,3 ऑडियोमेटरी करण्यात आले.

यावेळी सर्जन डॉ.काणे मॅडम,कान नाक घसा तज्ञ डॉ.खडतरे मॅडम यांच्याकडे तपासणी करून एकूण 25 बालकांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वरील विशेष आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी सोलापूर व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश कुमार सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.यावेळी कान नाक घसा तज्ञ डॉ.सुप्रिया खडतरे व भूलतज्ञ डॉ.अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत 10 मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या शिबिरासाठी सर्व RBSK पथकातील वैद्यकीय अधिकारी व सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.