घरफोडी-चोरीतील 7 जण ताब्यात; हद्दपार आरोपींची सखोल तपासणी
नांदेड पोलिसांकडून मोठी कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांवर कारवाई
नांदेड /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/२०२५ – शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई केली.विविध गुन्ह्यांत वॉरंट असलेल्या आरोपींना ताब्यात घेत निष्काळजी गुन्हेगारां विरुद्ध कडक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील २२ आरोपींवर कारवाई केली.
चोरी व घरफोडीतील 7 आरोपींना घेतले ताब्यात
हद्दपार करण्यात आलेल्या 10 आरोपींच्या घरांची केली तपासणी
नाकाबंदी दरम्यान 110 वाहनांची केली तपासणी
हॉटेल, लॉज, धाबे यांची केली पाहणी
5 बॅलेबल वॉरंट्स बजावले
2 नॉन-बॅलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक केली तसेच हद्दपार असलेल्या एका आरोपीवर कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे.


