रोपळे कॅनॉल ब्रिजला गती; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात
अपघात प्रवण ठिकाणी दिलासा; तीन महिन्यांत रोपळे ब्रिज पूर्ण होणार
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/ २०२५- पंढरपूर – कुर्डूवाडी मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील कॅनॉलवर ब्रिज नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या कॅनॉलवर ब्रीज नसल्याने वाहनचालकांचे अपघात वाढले होते. २०१७ पूर्वीच कामास मंजुरी मिळाली आणि २०२० पूर्वी रस्त्याचे कामही पूर्ण झाले मात्र या ब्रिजचे काम रखडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.

मात्र माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी निवडून आल्यानंतर हे प्रलंबित काम वेगाने मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित कामातील अडथळे दूर करून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.

आज आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते ब्रीज कामाचे भूमिपूजन करण्यात आले.येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कामामुळे रोपळे परिसरातील वाहतूक सुकर होणार असून अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

समस्त रोपळे ग्रामस्थांनी आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करून प्रलंबित कामाला गती दिल्याबद्दल आभार मानले.

