मुंबईतील भाविकाकडून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास ₹ ५१ हजारांची देणगी: कै. मेस्त्री दांपत्याच्या स्मरणार्थ अर्पण

मुंबईतील भाविकाकडून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास VitthalRukmini mandir ₹५१ हजारांची देणगी: कै.मेस्त्री दांपत्याच्या स्मरणार्थ अर्पण

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास मुंबईचे भाविक सौ.सुशिला कानकीया यांनी कै.मदन व मथुरा मेस्त्री यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची देणगी अर्पण केली.माघी यात्रेनिमित्त देणगी सुविधांची माहिती.

Pandharpur VitthalRukmini mandir news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जानेवारी : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास मुंबई येथील भाविक सौ.सुशिला जयंतीलाल कानकीया यांनी कै.मदन मुकुंद मेस्त्री व कै.मथुरा मदन मेस्त्री यांच्या पावन स्मरणार्थ रुपये ५१,०००/- (एकावन्न हजार) इतकी देणगी अर्पण केली.

ही देणगी स्वीकारल्यानंतर मंदिर समितीच्यावतीने देणगीदारांचा मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते मंदिर समितीची दैनंदिनी व दिनदर्शिका प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदारांचे कुटुंबीय तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

सध्या माघी यात्रेचा कालावधी सुरू असून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभपणे देणगी अर्पण करता यावी यासाठी अतिरिक्त देणगी स्टॉल तसेच QR Code,RTGS, संकेतस्थळ व मोबाईल ॲप यांच्या माध्यमातून ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देणगी अर्पण करण्यास इच्छुक भाविकांनी श्री संत तुकाराम भवन येथील मंदिर समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग प्रमुख राजेश पिटले यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top