आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी,सिईओ कुशल जैन यांचे तत्परतेमुळे सर्व कामांना गती
जि.प.अध्यक्ष दिपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पालकमंत्र्यांचे मानले आभार
आषाढी यात्रेसाठी 4.5 कोटींचा निधी मंजूर; वारकऱ्यांच्या सुविधांना जिल्हा परिषदेकडून हिरवा कंदील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदानाचा निर्णय
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जून २०२६ –सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आषाढी यात्रा कालावधीत ग्रामपंचायतींना साडेचार कोटी रूपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायतींच्या अनुदानात १ कोटी रूपयांची वाढ करणेत आली आहे.

वारकर्यांना देण्यात येणार्या विविध कामांना मंजुरी आजच्या सर्वसाधारण सभेत देणेत आली.जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य हे होते. या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदी प्रमुख उपस्थित होते.

या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागांतर्गत भरघोस निधी वारकर्यांसाठी दिल्याबद्दल अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार,पक्ष नेत्या रश्मी बागल,जि प सदस्य पृथ्वीराज माने,व्यंकटेश भालके, अतुल पवार, अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले.
ग्रामपंचातींना वाढीव अनुदानाची मागणी
पालखी मार्गावरील सांगोला,माढा व बार्शी,मंगळवेढा व उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून येणार्या मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देणेची मागणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी १ कोटी रूपयांची वाढ करण्यात आली असल्याचे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.यापुर्वी ८१ग्रामपंचायतींना 3 कोटी 50 लाख रूपये अनुदान देणेत येत होते. यामध्ये १ कोटी रूपये वाढ करणेत आली आहे. आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मध्ये समावेश करणेत आला आहे. ग्रामपंचायत विभागांतर्गत वारकरी स्वागत कमान व वारकर्यांना पायांना आराम मिळण्यासाठी फुटमसाजर च्या कामांना मंजुरी देणेत आली.मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हॅंगर), वारकरी यांच्यासाठी शौचालय सुविधा व पालखी मार्गावरील स्वच्छता, स्नानगृह,पालखी तळांवर जोडणारे रस्ते,पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुविधा,वारकर्यांसाठी औषधे खरेदी,मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांनी एकमताने मंजुरी देण्यात आली असल्याचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पिण्याचे टॅंकर ची निविदा सर्वात प्रथम पुर्ण केले बद्दल सिईओ कुशल जैन यांनी अभिनंदन केले.कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर व त्यांचे टीमने वेळेत निविदा पुर्ण केली आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांचा अभिनंदनाचा ठराव
विधान परिषदेचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांचे निवडीबद्दल जिप सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. जिप अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार व सदस्यांनी एकमताने अभिनंदन केले.
सिईओ कुशल जैन यांची तत्परता
वारकरी यांचे सुविधांसाठी पुणे, सातारा,सोलापूर यांचेसह तिन्ही जिल्ह्यातील विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया व सुक्षंम नियोजन करून कामांना गती दिल्याबद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदन केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व नियोजना साठी बारकाईने लक्ष दिले आहे. पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधिक्षक तांबोळी , कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेश वैद्य यांनी सर्वसाधारण सभेसाठीचे व्यवस्थेचे नियोजन केले .






