क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी क्रेडाईला विनंती करण्यात आली होती.क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची देशातील मान्यवर संस्था असून पंढरपूर शाखेचेही कार्य समाजोपयोगी आहे.पंढरपूर शाखेच्या सदस्यांनी जातीने उपस्थित राहून स्वतः चा प्रोजेक्टर, स्क्रीन आदी तांत्रिक साहित्य आणत नागरिकांना सदर डीपी प्लॅन दाखवून समजावून दिला. नागरिकांनी शंका विचारलेल्या शंकांना त्यांनी समर्पक उत्तरे देत समाधानही केले. आणखीही काही शंका असल्यास पुढेही मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.तसेच आक्षेप नोंदणीबाबत सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी क्रेडाई चे पंढरपूर शाखा अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, प्रदेश समन्वयक अमित शिरगावकर,सचिन पंढरपूरकर,मिलिंद वाघ,आराध्ये आदी उपस्थित होते.प्रत्यक्ष प्लॅन समजावून सांगण्याचे काम काम क्रेडाईचे सचिव शशिकांत सुतार व संतोष कचरे यांनी केले. माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक तुकाराम राऊत यांनी या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.तांत्रिक बाबी समजावून दिल्या.
यानिमित्ताने बचाव समितीच्यावतीने क्रेडाई पदाधिकार्यांचा स्वागत सत्कार अभयसिंह इचगांवकर, कौस्तुभ गुंडेवार ,ॲड विनायक उंडाळे,ओंकार वाटाणे यांनी केला.

