पोलिस पाटलाची ठेकेदारी,प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या गैरवर्तणूक व दादागिरी च्या विरोधात व आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये जमिन संपादित झाली नाही त्या गायरान जमिनीचे संपादन मंगळवेढा उपविभागीय अधिकार्यांनी सांगोला येथील एका एजंटच्या साहाय्याने साटेलोटे करून एका शेतकऱ्याचा नावावर चक्क 1 कोटी 65 लाख हडप केले आहे. नकाशे दोन तयार केले आहेत एका नकाशात गट नं 640 हा गट संपादित झाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायत गट नं 695 गायरान हा संपादित झाला होता पण त्यात बदल करून नकाशा बदल करून गायरान ठिकाणी 640 गट दाखवून एजंट मार्फत लाखात कमिशन घेतले आहे हे उघडच झाले आहे त्यामुळे हे शासनाला रक्कम वसूल करावी व त्या व्यक्तीवर कारवाई करावी.ज्या शेतकऱ्यांची जमिन गेली त्यांना मोबदला मिळत नाही आणि ज्यांची जमिन गेली नाही त्यांना मोबदला मिळतोय हा मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांचा प्रताप उघड झाला आहे.

पोलिस पाटील यांनी तर चक्क ठेकेदारी चालवली आहे आणि दुसर्या पोलिस पाटील यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत तरीही प्रांत अधिकारी यांनी त्यांची पाठराखण सुरू केली आहे.या पाठराखण करण्यामागे किती अंधार आहे तो प्रकाशात आणण्यासाठी प्रहार संघटना प्रयत्न करीत आहेत मारोळी मध्ये ठेकेदारी चालवली जाते हे उपविभागीय अधिकारी यांना माहिती आहे या दोन्ही पोलिस पाटलांच्या वरती कारवाई करावी व त्यांचे निलंबन करावे अशी प्रहार ची मागणी आहे.
मंगळवेढा तालुक्यातील संपादित केलेल्या क्षेत्रातील नकाशे हे टक्केवारी प्रमाणे वळवले आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे अशा मागण्या घेऊन प्रहार चे सिदराया माळी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे,शहराध्यक्ष युवराज टेकाळे,गिरीश पाटील,सचिन सोमुत्ते, सतिश सर्जे, देवदत्त पवार,संतोष यादव, तानाजी पवार,रोहिदास कांबळे हे आंदोलनात सहभागी आहेत.
जोपर्यंत उपविभागीय अधिकारी कारवाई करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहे असे उपोषणकर्ते सिदराया माळी यांनी सांगितले आहे