जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागासाठी वरदान; 311 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार
आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी जीवन ज्योत संस्थेची पुढाकाराने सामाजिक बांधिलकी दृढ – जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागातील लोकांसाठी ठरतेय वरदान
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त 311 रुग्णांची तपासणी व उपचार शिबिर संपन्न
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज : जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था बोराळे व बोराळे परिसरातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ, शेतकरी,शालेय विद्यार्थी याचबरोबर अपंगांसाठी मोलाचे योगदान देत असुन जनतेसाठी वरदान ठरले आहे. संस्थेचे अध्यक्ष चणवीर लंगोटे हे कायम सामाजिक कार्यासाठी तत्पर असून आज बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जीवन ज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोगनिदान शिबिरात 311 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
गेल्या पाच वर्षापासुन तालुक्याच्या पूर्व भागात शालेय साहित्याचे वाटप, महापुरुषांच्या जयंती,अपंगांसाठी विविध उपक्रम, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना तसेच एसबीआय बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते.
यावेळी प्रमुख पाहुणे युवा नेते सोमनाथ आवताडे म्हणाले, नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे.सुरू असलेल्या कडाडीच्या थंडीमुळे ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांमध्ये एच बीचे प्रमाण कमी होत आहे, यावर वेळेत तपासणी, उपचार होणे गरजेचे आहे.

शासनाकडून जन आरोग्यासाठी अनेक योजना मोफत राबवल्या जात आहेत, नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. बोराळे भागात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे डॉ शेख मॅडम,डॉ माळी यांच्याकडून आरोग्यसेवा दखलपात्र व समाधानकारक असल्याचे गौरव उद्गार आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना काढले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील शिर्के हॉस्पिटलच्या डॉ प्रीती शिर्के उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर बोराळे चे विद्यमान सरपंच सुजाता विनोद पाटील,डॉ शरद शिर्के,माजी सरपंच गणेश गावकरे, विनोद पाटील,युवक नेते सचिन नकाते,शिवसेना जिल्हा संघटक राजकुमार स्वामी,जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चणवीर लंगोटे, डॉ रेश्मा शेख,डॉ.स्नेहल माळी, युवक नेते सुहास पवार,प्रमोद म्हमाणे, आदीसह मान्यवर उपस्थित होते.
बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्त जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून सर्वरोग निदान शिबिर घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.
या शिबिरात गरोदर महिलांची तपासणी, उपचार यासह बीपी,शुगर,डोळे तपासणी, बांधकाम कामगार योजनेंतर्गत रक्ताची तपासणी यासह पुढील उपचार व ऑपरेशनसाठी रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्राचे निरीक्षक प्रमोद म्हमाणे,प्रवीण पवार, द्रौपदी राठोड,जीवन ज्योती फाउंडेशनचे पदाधिकारी नागनाथ म्हमाणे,दत्तात्रय कोरे, सुनील पाटील, नवनाथ पाटील, वैभव कोरे, सुदर्शन लंगोटे, अमावसिद्ध लंगोटे,इम्रान तांबोळी, प्रणव लंगोटे,आनंद गवळी,रुद्र कोटे, ज्ञानेश्वर पाटील,प्रणव गवळी, युवराज बनसोडे, रियान तांबोळी,ओम पाटिल, बापू घोडके,आरोग्य सहाय्यक राजेंद्र सुरवसे, आरोग्य सेवक विठ्ठल क्षीरसागर, रविकिरण माने,रावसाहेब गरंडे ,अजय जाधव, महेश जिरगे, गणेश मोरे, तेजस मूलभूले ,सुरज बांधले, औषध निर्माता अधिकारी सुमय्या मुजावर, आरोग्य सेविका पूजा शिंदे, सुवासिनी माने, राणी पवार, अनिता सलगर ,माधुरी गायकवाड, रिजवान मुजावर यांच्यासह रोहित पाटील,अर्चना टकले,प्रमोदिनी गुंडरे, कल्लाप्पा मेडीदार, कलावती मूर्तीकर, नवलाबाई पुजारी,सीमा रणदिवे, सरोजिनी गवळी, कबीर सुतार, बाळू नाईकवाडी यांच्यासह शिर्के हॉस्पिटलचे सागर पवार, गलांडे, जमदाडे सिस्टर, आशाताईं आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते पत्रकार अक्षय पवार यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रमोद म्हमाणे यांनी मानले.

