सामाजिक बांधिलकीचा सन्मान- हजारो रुग्णांना मदतीचा हात देणारे मंगेश चिवटे गौरवाचे मानकरी

आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार

सामाजिक बांधिलकीचा सन्मान- हजारो रुग्णांना मदतीचा हात देणारे मंगेश चिवटे गौरवाचे मानकरी

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना राज्यस्तरीय झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबई येथील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक आरोग्य कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर व झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

आरोग्यदूत मंगेश चिवटे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य समस्यांवर कार्यरत आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्य दूत फाउंडेशन या विविध उपक्रमांतून हजारो रुग्णांना आर्थिक मदत,उपचार मार्गदर्शन,हॉस्पिटल समन्वय,तातडीचे वैद्यकीय सहाय्य यांसारख्या सेवांचा लाभ मिळाला आहे. सामाजिक घटकांपर्यंत आरोग्य सुविधा सहज, प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याची राज्यभरातून प्रशंसा होत आली आहे.

झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ या व्यासपीठावर आरोग्य क्षेत्रातील धोरणे, नव्या संकल्पना, आरोग्य उपक्रमांची दिशा यावर चर्चा झाली. याच कार्यक्रमात मंगेश चिवटे यांच्या आरोग्यसेवेतील सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करून त्यांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देण्यात आला.

Leave a Reply

Back To Top