डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील डॉ.काणेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले.

डॉ.वर्षा काणे यांनी हाँस्पिटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी या हाँस्पीटलचे उदघाटनापासून ते आजपर्यंत आम्ही असंख्य रुग्णावर उपचार करून नीट केले त्याबद्दल आम्ही व आमचे सर्व कर्मचारी समाधानी आहोत आणि यापुढेही असेच काम करणार आहे असे सांगितले .

दि.२४ एप्रिल ते २ मे दरम्यान डॉ.काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधे वर्धापनदिना निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक २७ एप्रिल रोजी जीम आणि व्यायाम शाळेतील लोकांसाठी सीपीआर प्रशिक्षण जीवन संजीवनी देण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन फिटनेस क्वीन वर्षा उसगावकर च्या हस्ते झाले.

दिनांक २८ एप्रिल रोजी गर्भाशय मुखाचा कॅन्सर ची तपासणी शिबीर सोलापूरचे सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल ,भारत विकास परिषद पंढरपूर, काणे मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

साधारणत: रू २०००/- खर्चाची ही तपासणी मोफत ठेवण्यात आली होती.कॅन्सर होण्यापूर्वीच प्रि कॅन्सरस स्टेजमधे निदान व उपचार होऊ शकतात.ही तपासणी चाळीशी नंतर प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा तरी करून घेणे गरजेचे व हितावह आहे, असे प्रतिपादन या हॉस्पिटल चे प्रमुख स्त्री रोग तज्ज्ञ डॉ सुरेंद्र काणे यांनी केले.

या सोहळ्याची सांगता ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या आरोग्य आणि अध्यात्म या विषयावरील व्याख्यानाने झाली. डॉक्टर,शिक्षक आणि सच्चा समाजसेवक यांना वेगळे अध्यात्म करण्याची गरज नाही. आरोग्य आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त असेल तरच आरोग्य उत्तम राहील. मनातील कचरा काढला की, मन निरोगी राहते.मनातील कचरा कसा काढायचा हे अध्यात्म शिकवते.डॉक्टर काणे कुटुंबीयांची पंढरपूर करांच्या वैद्यकीय सेवेची सत्त्याऐंशी वर्षांची गौरवशाली परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्यावत सोयीसुविधा युक्त सुसज्ज नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल त्यांनी अभिनंदन करुन शुभाशीर्वाद दिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम डॉक्टर काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *