बालविवाहाची समस्या थांबवण्यास सर्वसमावेशक कायदा व्यवस्था,प्रबळ इच्छाशक्ती,लोकसहभागाची विशेष गरज आहे – न्यायाधीश श्रीमती एस.ए. साळुंखे

बालविवाह रोखण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण – न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे

पंढरपूर दि. 04:- बालविवाहाची समस्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक कायदा व्यवस्था आणि प्रबळ इच्छाशक्ती तसेच लोकसहभागाची विशेष गरज आहे. जर बालविवाह झाला तर बालविवाहासाठी दोषी ठरलेल्या सर्व व्यक्तींना दंड, किंवा शिक्षा होऊ शकतात. या कायद्यात मुलांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलींचे 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. बालविवाह ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे. मुली जेव्हा शिकू लागतील तेव्हा त्या स्वतः बालविवाहाला नाकारतील. त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे यांनी कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेज येथे केले.

किमान समान शिबीराअंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेज, पंढरपूर येथे जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीरादरम्यान अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी शिबीराची प्रस्तावना केली .शिबीराचे सूत्रसंचालन ॲड.राहुल बोडके यांनी केले.शिबीराचे आभार उपाध्यक्ष शशिकांत घाडगे यांनी मानले.

कार्यक्रमादरम्यान सागर गायकवाड यांनी कायदेविषयक माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयातील प्रा.झांबरे मॅडम, प्रा.कुंभार मॅडम , प्रविण मुळे सर, महाविद्यालयातील विद्यार्थी ,सुहाशी ठाकरे, ॲड.व्ही.एन.साळुंखे,न्यायालयीन कर्मचारी के.के.शेख,विशाल ढोबळे,विवेक कणकी, किरण घोरपडे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *