आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापक पदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख ची हकालपट्टी करा-हिंदु जनजागृती समिती

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा -हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी

मुंबई ,दि.०६.०५.२०२४ – हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली आहे. याविषयी ६ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंत्रालयामध्ये जाऊन शिक्षण विभागाच्या सचिवांकडे कारवाईची मागणी केली आहे.

या वेळी अधिवक्ता अनिश परळकर, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक,विलास निकम, संदीप तुळसकर, वेणुगोपाळ बल्ला हे उपस्थित होते. आतंकवाद्यांचे समर्थन करूनही शाळा व्यवस्थापनाने त्यागपत्र देण्याची मागणी केल्यावर परवीन शेख यांनी मी भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात रहात असून मला बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शाळा व्यवस्थापन त्यांना त्यागपत्र देण्यासाठी दबाव टाकत आहे, असा बनाव केला. हा गंभीर प्रकार हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिला.

आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण पुढे करून परवीन शेख यांनी आतंकवाद्यांची बाजू घेतली आहे.आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने या निवेदनातून उपस्थित केला आहे.

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा – गृहविभागाकडे मागणी

परवीन शेखसारख्या भारतातील सुशिक्षित मुसलमान महिला आतंकवाद्याला उघडपणे सहानुभूती दाखवतात हे गंभीर आहे. अशा प्रकारे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे कुणी आतंकवाद्यांचे समर्थन करत असेल तर त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गृहविभागाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *